डोंबिवलीतील मोबाईल चोर अटकेत

      १२ तासात मोबाईल चोरटे गजाआड 

डोंबिवली / शंकर जाधव :   मुंबईत विविध पोलीस ठाणेमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेले दोघा चोरट्यांनी डोंबिवली शहराला टार्गेट केले. मोबाईल दुकानाचे शटर उचलटून मोबाईल चोरणाऱ्यांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून गजाआड केले.

   पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिरोज उर्फ बटला उर्फ राहुल मुन्ना खान ( २५ , श्री समर्थ सेंटर, देसलेपाडा,डोंबिवली पू.) आणि सागर श्याम पारखे ( २३, रा. श्री समर्थ कृपा कृपा सर्विस सर्विस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पू.) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

 गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १२ तासाचे आत दोघा चोरट्यांना पकडण्यास रामनगर पोलिसांना यश आले. चोरट्यांकडून एकूण २,३७,०६० रू किंमतीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले.

     १४ तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील उर्सेकर वाडी येथील मधूबन गल्लीतील नव डोंबिवली सोसायटी.डी विंग, गाळा न.३० येथे प्रिया मोबाईलचे दुकानाचे शटर दोन अनोळखी इसमांनी उचकटुन दुकानात प्रवेश करून एकुण ४,०७,१२०/- किंमतीचे मोबाईल घरफोडी चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी फिर्यादी सुंदरम विश्वनाथ गवंडर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर पोनि तडवी ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हासगुळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, पोहवा विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड यांनी मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू केला. दोघा चोरताना फिरोज उर्फ 8 बटला उर्फ राहुल मुन्ना खान वय २५ वर्ष य श्री समर्थ सेंटर, देसलेपाडा,डोंबिवली पू. २) सागर श्याम पारखे वय २३ वर्ष रा. श्री समर्थ कृपा कृपा सर्विस सर्विस सेंटर, देसलेपाडा, डोंबिवली पू. यांना निष्पन्न करून त्यांना गुन्हा घडल्यापासुन अवघ्या १२ तासाच्या आत केली.अटक केलेल्या चोरट्यां मुंबई येथील विविध पोलीस ठाणेमध्ये घरफोडी, चोरी, मारहाणीचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पुढिल तपास डोंबिवली पोलीस ठाण्याचे सपोनि बळवंत भराडे हे करीत आहेत.

    सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३. कल्याण सचिन गुंजाळ, ससहाय्यक पोलीस आयुक्त डोंबीवली विभाग, सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पोनि (गुन्हे) समशेर तडवी यांचे मार्गदर्शन व देखरेखी खाली सपोनि बळवंत भराडे, पोउनि केशव हासगुळे, पोउनि विजय कांबळे, पोहवा सुनिल भणगे, पोहवा सचिन भालेराव, पोहवा तुळशिराम लोखंडे, विशाल वाघ, पोना हनमंत कोळेकर, पोशि शिवाजी राठोड, राहुल ठाकुर यांनी बजावली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post