डोंबिवली / शंकर जाधव : ज.ए.इ. चे महिला महाविद्यालय, डोंबिवलीचे अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुनील जगन्नाथ घाडगे यांना अर्थशास्त्र विषयातील शिवाजी विद्यापीठाची पी. एच. डी. प्रदान करण्यात आली आहे. प्रा. घाडगे यांच्या पी.एच.डी. संशोधनाचा विषय Financial Indusion Through Micro Finance in Thane District असा होता. त्यांचे मार्गदर्शक / गाईड रयत शिक्षण संस्थेचे धनंजयराव गाडगीळ, कॉलेजचे माजी विभागप्रमुख आणि उपप्रायार्च प्रा. डॉ. एल. एन. घाटगे सर होते. तसेच अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल वावरे सर यांनीदेखील सहकार्य आणि मार्गदर्शन केले. ठाणे जिल्ह्यातोल सुक्ष्मवित्त, बचतगट आणि वित्तीय समावेशन असा व्यापक विषय प्रा. घाडगे यांनी संशोधित केला आहे.
प्रा. घाडगे हे गेली वीस वर्ष ज.ए.इ. चे महिला महाविद्यालय, डोंबिवली येथे अर्थशास्त्राचे अध्ययन, अध्यापनाचे कार्य करित आहेत. आनंदाची बाब म्हणजे नुकत्याच संपन्न झालेल्या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबईच्या सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेवर भरघोस मतांनी निवड झाली.प्रा. सुनील घाडगे यांनी आजपर्यंत अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अर्थशास्त्र आणि विविध विषयांवर संशोधन पेपर्स (शोधनिबंध) सादर केले आहेत.त्यांच्या या यशाबद्दल ज.ए.इ. चे संस्थाचालक, अध्यक्ष डॉ. उल्हास कोल्हटकर, कार्याध्यक्ष, मा. शैलेंद्र साळवी सर आणि अनेक संचालकांनी अभिनंदन केले. तसेच सहकारी, प्राचार्य, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
