दिवा / आरती मुळीक परब : दिवा टर्निंग येथे सार्वजनिक शौचालय व्हावे अशी मागणी दिवावासीय करत होते. अखेर ही मागणी पूर्णत्वास जात असून शौचालयासाठी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांच्या पुढाकाराने खासगी जागा उपलब्ध झाल्याने मुख्य रहदारीच्या ठिकाणचा सार्वजनिक शौचालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला.
दिवा टर्निंग हा जास्त रहदारीचा भाग येतो. येथून दिवा शीळ फाटा, नवी मुंबई आणि ठाण्यासाठी बसेस निघतात. तर दिवा स्टेशन, आगासन फाटक, दिवा शीळ फाट्यावर जायला रिक्क्षा मिळतात. त्यामुळे येथून दिवसाला हजार ते दोन हजार प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवासा दरम्यान नैसर्गिक विधी करायला कोणतेही शौचालय उपलब्ध नव्हते. महिला आणि लहान मुलांना खुप त्रास होत होता. पाच ते दहा किलोमीटर पर्यंत एक ही शौचालय नसल्याने महिलांची कुचंबना होत होती. नैसर्गिक विधी साठी महिलांना स्वतःचे घर गाठावे लागत होते. त्यासाठी महिलांनी मा. नगरसेवक शैलेश पाटीलकडे समस्या मांडल्या होत्या.
तसेच दिवा टर्निंगला सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह व्हावे अशी मागणी शहरातील महिला आणि नागरिक वारंवार करत होते. मात्र या ठिकाणी जागा उपलब्ध नसल्याने अडचणी येत होत्या. जागेचा प्रश्न सोडवण्यासाठी माजी नगरसेवक शैलेश पाटील यांनी पुढाकार घेत येथील खाजगी जागा संबंधित जागा मालकाशी चर्चा करून सार्वजनिक शौचालयासाठी उपलब्ध करून दिल्याने शहरातील नागरिक शैलेश पाटील यांचे आभार मानत आहेत. सार्वजनिक शौचालयासाठी शैलेश पाटील यांनी संबंधित जागेवर जाऊन मोजणी करून देत या ठिकाणी सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह बांधण्याचा मार्ग मोकळा करून दिला. खाजगी जागा मालकासोबत शैलेश पाटील यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने चर्चा करून हा प्रश्न सोडवल्याने महत्त्वाच्या रहदारीच्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय व प्रसाधनगृह होण्याचा मार्ग मोकळा झाला. शैलेश पाटील यांच्या या कृतीचे कौतुक दिवा शहरातील नागरिक करत असून नागरिकांनी पाटील यांच्या या भूमिकेबद्दल आभार मानले आहेत.
सानिया मोपिरकर, महिला - शैलेश दादांचे खुप खुप आभार. ही शौचालयाची मागणी खुप दिवसांपासून होती. या दिवा टर्निंगला घरासाठी भाजी घ्यायला आली तरी पटापट भाजी आणि घरगुती सामान घेऊन घरी जावे लागत होते. आता तेव्हढी धावपळ आम्हा महिलांची होणार नाही. घरच्या खरेदी साठी निघताना लहान मुलांना घेऊन निघावे लागते. त्यात जर त्यांना बाथरुमला झाली तर खुप धावपळ व्हायची.
Tags
महाराष्ट्र
.jpeg)
