मद्यपी तरुणाचा डोंबिवलीत धिंगाणा

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली ठाकुर्ली रोडवर मध्यरात्रीच्या सुमारास एका मद्यपी तरुणाने भर रस्त्यात एकच धिंगाणा घातला. या तरुणाने लाकडी दांडके हातात घेत येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण सुरू केली. जवळपास अर्धा तास या तरुणाचा धिंगाणा या रस्त्यावर सुरू होता.

    घटनेची माहिती मिळताच टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या तरुणाला ताब्यात घेतले दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. पवन केणे असे हा मद्यपी तरुणाचे नाव असून याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.



Post a Comment

Previous Post Next Post