जय श्रीराम नावाचा जयघोष करत दिव्यातून असंख्य शिवसैनिक अयोध्येला रवाना

 


दिवा / आरती मुळीक परब: राज्यभरातून शिवसैनिक अयोध्येला जाण्यासाठी निघाले असून दिव्यातूनही काल असंख्य शिवसैनिक अयोध्येला निघाले. 

दिव्यातील शिवसेना शहरप्रमुख उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक शैलेश पाटील, माजी. नगरसेवक अमर पाटील, दिपक जाधव, उपशहर प्रमुख ॲड. आदेश भगत, निलेश पाटील, गुरु पाटील विभाग प्रमुख साबे गाव, शशिकांत पाटील- गणेश नगर विभाग प्रमुख, सुरेश पाटील मातोश्री नगर शाखा प्रमुख, निलेश म्हात्रे दातिवलि शाखा प्रमुख, विवेक पाटील, प्रकाश हरणे, मंगेश चव्हाण, अमर पावले उपशाखा प्रमुख बेडेकर नगर, विठ्ठल घेवडे- शाखा प्रमुख, केशव पाटील - शाखा प्रमुख, अरुण म्हात्रे, राजेश पाटील उपविभाग प्रमुख, मनोज गुप्ता उपविभाग प्रमुख, दिपक मुंडे उपविभाग प्रमुख, रामकृष्ण हरी जेष्ठ शिवसैनिक, अरूण म्हात्रे उपविभाग प्रमुख, विजय भोईर उपविभाग प्रमुख, संजय जैस्वाल, जयेंद्र पांचाळ काका, राजेश खागटे यांसह अनेक शिवसैनिक अयोध्येला रवाना झाले.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले. दिवा स्टेशनला जाताना शिवसैनिकांनी जय श्रीराम, प्रभू रामचंद्रजी की जय जयघोष केला. यावेळी शहरप्रमुख उपमहापौर रमाकांत मढवी म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील शिवसैनिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. येत्या ९ तारखेला मुख्यमंत्री शिंदे हे शरयू नदीजवळ महाआरती करणार आहेत. त्यानंतर मंदिरात प्रभू श्रीरामचंद्राचे दर्शन घेणार आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post