दिव्यात मनसेकडून मोफत तिकीट वाटप

 

दिवा/ आरती मुळीक परब: स्थानिक आमदार राजू पाटील यांच्या प्रयत्ना नंतर दिवा पूर्वेकडील नव्याने सुरू करण्यात आलेल्या तिकीट घराचे काल शिवसेनेकडून लोकार्पण करण्यात आले असून त्याच निमित्ताने सर्व प्रवाशांचे तोंड गोड करण्यासाठी साखर आणि पेढे वाटले. तसेच तेव्हा नागरिकांना मोफत तिकीट वाटप केले.                 आजचा दिवस संस्मरणीय करण्यासाठी आज दिव्यातून लोकल प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना मनसे दिवा शहरतर्फे मोफत तिकीट वाटप करण्यात आले आहे, असे मनसे दिवा अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी सांगितले. तसेच आमदार राजू पाटील यांनी सतत दोन ते तीन वर्षापासून तिकीट घरासाठी पाठपुरावा करून अखेर आज दिवेकरांना सुस्सज तिकीट घर उपलब्ध झाले यामुळे पूर्वेतील दिवेकर नागरिकांचे परिश्रम व वेळेची बचत होणार आहे, असे मनसेचे दिवा शहर प्रमुख तुषार पाटील यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post