डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भाजपतर्फे दिव्यात आरोग्य शिबीर



दिवा/ आरती मुळीक परब: भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर व आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश केळशिकर यांच्या वतीने दिवा पूर्वेस मोफत भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. नाहर हॉस्पिटलच्या सहयोगाने शिबिरात मोठ्या सर्जरीवर मार्गदर्शन, मधुमेह, रक्तदाबावर योग्य नियंत्रण ठेवण्यासाठी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत सल्ले व औषधे देण्यात आली. तसेच हायपर टेन्शन सारख्या आजारावर गोळ्या, मधुमेहावर गोळ्या मल्टिव्हिटॅमिन, डोलो, बॉडीपेन गोळ्या, ओ. आर. एस. पावडर इत्यादी औषधे नागरिकांना मोफत देण्यात आली. तसेच अल्पदरात श्रवण यंत्र वाटप, मोफत डोळे तपासणी करुन कमी दरात चष्मा ही नागरिकांना दिला गेला. त्यावेळी नवीन आधार कार्ड व अपडेट आधार कार्ड शिबिर राबवण्यात आले. प्रसंगी दिवेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत सदर शिबिराचा लाभ घेतला.

प्रसंगी भाजपचे अशोक पाटील, विनोद भगत, विजय भोईर, गणेश भगत, सचिन भोईर, दिलीप भोईर, अंकुश मढवी, समीर चव्हाण यांच्यासह दिव्यातील अनेक मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी त्यावेळी उपस्थिती दर्शवीली होती.     



 


Post a Comment

Previous Post Next Post