शालेय वस्तूंचे 15 जूनपासून वाटप


पालिका शिक्षण विभागाची मोर्चेबांधणी

मुंबई: पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप यंदाच्या पहिल्या दिवशी करण्यात येणार आहे. यासाठी अनेक शाळांमध्ये दप्तर, वाॅटर बाॅटल, पुस्तके, वह्या आदीचे वितरण ही करण्यात आले आहे. त्यामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी ४ लाख विद्यार्थ्यांना २७ शालेय वस्तूंचे वाटप होईल, असा विश्वास पालिकेच्या शिक्षण विभागाचे सह आयुक्त अजित कुंभार यांनी सांगितले.

      यंदा १५ जूनपासून शाळांची घंटा वाजणार आहे. दरवर्षी शाळा सुरु झाल्यानंतर शालेय वस्तूंचे वाटप होत नाही, अशी टीका शिक्षण विभागावर केली जाते. त्यामुळे यंदा शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी २७ शालेय वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ७ मार्च २०२२ रोजी पालिकेत निवडून आलेल्या नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर प्रशासकाचा कारभार सुरू झाला. मात्र या प्रक्रियेत पालिकेचे अनेक प्रस्ताव मंजुरीसाठी रखडून पडले. यामध्ये शालेय वस्तूंच्या खरेदीचे प्रस्तावही रखडले होते. मात्र पालिकेने यावर्षी नियोजबद्ध काम करताना विद्यार्थ्यांना शालेय वस्तू शाळेच्या पहिल्या दिवशीच देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post