डोंबिवली / शंकर जाधव : रस्ता चांगला असून त्यावरून वाहने जात असताना झाडांमुळे अपघात होत असतील तर त्यावर पालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असते. पण प्रशासनाच्या दुर्लक्षितपणाचा फटका वाहनचालकांना बसायचे नवीन नाही.झाडच रस्ता अडवून असल्याने मोठे वाहने त्याच्या झुकत असल्याचे चित्र दिसते. डोंबिवली पूर्वेकडील मारुती आंगन या सोसायटी जवळील एक झाड अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. या रस्त्याने मोठी वाहने बस, ट्रक जाताना झाडाच्या फांदीला घासून त्यामुळे बस ट्रक फांदीला वळसा घालून न्यावी लागते.
डोंबिवलीत शहरातील अनेक रस्ताच्या कडेला मोठी झाडे आहेत.पर्यावरणासाठी झाडे आवश्यक असली तरी ज्या झाडांमुळे रस्त्यावरील वाहनांचा अपघात होण्याची शक्यता असते त्या झाडांच्या फांद्या तोडणे आवश्यक असते.
पूर्वेकडील मारुती आंगन या सोसायटी जवळील एक झाड अत्यंत धोकादायक स्थितीत असताना या रस्त्याने मोठी वाहने बस, ट्रक जाताना झाडाच्या फांदीला घासली जातात. त्यामुळे मोठी वाहने फांदीला वळसा घालून पुढे जातात.या प्रकारामुळे भविष्यात अपघात होण्याची शक्यता असल्याने मनसे पदाधिकारी संजय चव्हाण यांनी पालिकेच्या उद्यान विभागाला कळविले होते.मात्र अपघात होण्याची वाट प्रशासन पाहत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.रस्त्याला घडविणाऱ्या झाडासमोर वाहने झुकली असली तरी प्रशासन मात्र झाडापुढे झुकत नाही अशी चर्चा परिसरात सुरू झाली आहे.