सुरांच्या मैफिलीत ‘साहित्यवलय’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न


प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव’ पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार सन्मानित

पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या संगीतमय संवादाला ठाणेकरांची दाद


ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि धृपद एंटरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्यवलय पुरस्कार वितरण सोहळा’ पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल मैफिलीत गडकरी रंगायतन येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.


यावेळी ‘प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार’ लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना प्रदान करण्यात आला. त्यांना रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.


सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर होत्या. प्रमुख उपस्थितीत मनसे नेते अभिजीत पानसे, दिग्दर्शक व कवी विजू माने, अभिनेते सुयश टिळक, रवींद्र मोरे, तसेच आयोजक मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.


कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांचे मनमोहक गायन आणि त्यांचे शिष्य, कवी-संगीतकार ऋग्वेद देशपांडे यांच्यासोबत झालेला साहित्यिक संवाद प्रेक्षकांनी दाद देत ऐकला. सूत्रसंचालन मानसशास्त्रज्ञ पूजा देशपांडे यांनी केले.


 यावर्षीचे ‘साहित्यवलय पुरस्कार’ विजेते

  • साहित्य पदार्पण पुरस्कार: दीपक मच्याडो (बोरीवली) – ‘सारंगीचे सूर’
  • सर्वोत्कृष्ट कादंबरी: डॉ. क्षमा गोवर्धने-शेलार (जुन्नर) – ‘सवाष्ण’
  • स्त्रीवादी साहित्य: विद्या पोळ-जगताप (सातारा) – ‘बाय गं’
  • कथासंग्रह: सुरेंद्र दरेकर (पुणे) – ‘वर्जीतमध्य’
  • ललित लेखन: सुनील यावलीकर (अमरावती) – ‘सरतं काही सोडू नये’
  • अनुवादित साहित्य: ए. आर. नायर आणि जे. ए. थेरगावकर (कल्याण-डोंबिवली) – ‘देवाची स्वाक्षरी’
  • वृत्तबद्ध काव्यसंग्रह: कांचन सावंत (तळेगाव) – ‘रंध्रात भीनावा छंद’
  • कवितासंग्रह: धनाजी धोंडीराम घोरपडे (सांगली) – ‘जामिनावर सुटलेला काळा घोडा’
  • गजलसंग्रह: प्राजक्ता पटवर्धन (पुणे) – ‘निव्वळ योगायोग’
  • बालसाहित्य: गणेश शिवराम भाकरे (नागपूर) – ‘थेंबा थेंबाची कहाणी’
  • ऐतिहासिक साहित्य: श्रीधर लोणी (पुणे) – ‘पाकिस्तान का मतलब क्या’


 लक्षवेधी साहित्य पुरस्कार (२०२५)

 ‘लक्षवेधी साहित्य पुरस्कारां’साठी सात साहित्यिकांची निवड झाली 

कल्पना बांदेकर (सावंतवाडी), मृणालिनी चितळे (पुणे), सागर जाधव जोपुळकर (नाशिक), आदित्य अंकुश संतोषी (ठाणे), डॉ. सुमन नवलकर (वडाळा), रामदास खरे (ठाणे) आणि प्रदीप कुलकर्णी (मुलुंड).




Post a Comment

Previous Post Next Post