कल्याणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी छापला बॅनर
डोंबिवली / शंकर जाधव : उन्हाळ्यात खात संत्री हरवले आहेत आमचे पालकमंत्री ..पालकमंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री झाल्यापासून आपला पत्ता कुठेच लागत नाही ..तुम्ही जिथे कुठे ही असाल तिथून परत या आम्ही तुमची वाट पाहतोय' अशा आशयाचा बॅनर शनिवारी ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याणमध्ये लावण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याना विरोध करत बॅनर ताब्यात घेतला.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ठाणे जिल्हा पालकमंत्री पदाची धुरा हाती घेतल्यानंतर ते जिल्हा नियोजन समिती बैठकांना उपस्थित राहिले .मात्र जिल्ह्याचा दौरा केलेला नाही. कल्याण डोंबिवलीतही त्यांनी दौरा केला नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली.शनिवारी ठाकरे गटाचे पदाधिकारी रुपेश भोईर यांनी 'उन्हाळ्यात खात संत्री हरवले आहेत आमचे पालकमंत्री' या आशयाचा बॅनर छापून तो छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्याचा प्रयत्न केला .मात्र पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅनर लावण्यास विरोध करत हा बॅनर ताब्यात घेतला. याबाबत रुपेश भोईर यांनी नाराजी व्यक्त करत पोलिसांची, सरकारची दडपशाही सुरू असल्याचा आरोप केला.
कल्याण डोंबिवलीकर समस्यांनी ग्रासले आहेत त्यात पालकमंत्री एकदाही कल्याण डोंबिवलीत आले नाही याबाबत नाराजी व्यक्त केली.. पालकमंत्री हरवलेत का असा सवाल करत याबाबत बॅनर लावत होतो मात्र पोलिसांनी विरोध केला असे ठाकरे गट विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर यांनी सांगितले.
#ठाकरे गट आक्रमक # पालकमंत्री हरविल्याचा बँनर# रूपेश भोईर # पालकमंत्री शंभूराज देसाई