डोंबिवलीत कामगार दिन, महाराष्ट्र दिन साजरा

 


जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर शाळेचा उपक्रम 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पश्चिमेकडील जन गण मन इंग्लिश सेकंडरी स्कूल आणि विद्यामंदिर व वंदे मातरम महाविद्यालयात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.शाळेचे संस्थापक डॉ. राजकुमार कोल्हे ,सचिव डॉ प्रेरणा कोल्हे ,खजिनदार जान्हवी कोल्हे आणि इतर सर्व पदाधिकारी यांनी झेंडावंदन करून मानवंदना दिली. सर्वांनी राष्ट्रगीत म्हणले व ज्या गीताला महाराष्ट्राचे प्रथम दर्जा बहाल करण्यात आला आहे असे शाहीर साबळे यांनी लिहलेले व गायलेले गीत व अंगावर शहारा आणणारे ' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ' हे गीत गाऊन सर्वांनी महाराष्ट्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

   ब्रह्मा रांगतालय मैदानावर उभे राहून सर्वांनी जय महाराष्ट्र ची गर्जना करून अभिवादन केले. त्याचबरोबर संस्थापक आणि सचिव व इतर पदाधिकारी यांच्या बरोबर सर्व जे एम एफ परिवाराचा फोटो काढण्यात आला. यामध्ये सीबीएसई,स्टेट बोर्ड, डिग्री कॉलेज, ज्युनिअर कॉलेज ह्या सर्वांचा समावेश होता. दरवर्षी आमच्या शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांची वार्षिक सभा घेतली जाते.ज्यामधे वर्षभराचा कामकाज चा वार्षिक प्रगतीचा अहवाल सादर केला जातो. अध्यक्ष डॉ. राजकुमार कोल्हे , सचिव डॉ प्रेरणा कोल्हे ह्यांचे मार्गदर्शन व पुढील वर्षाचे नियोजन कसे असावे ह्याबद्दल मत सांगितले गेले.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कोणत्या समस्या आहेत किवा वर्षभरात कोणत्या समस्या ना सामोरे जावे लागले, त्याच बरोबर संस्थेबददल त्यांच्या भावना काय आहेत ,त्याच बरोबर संस्थापक, सचिव, समन्वयक,मुख्याध्यापक , उपमुख्याध्याक ह्यांच्या विषयी चे त्यांचे मत जाणून घेण्यासाठी सर्वांनाच एक मोघम प्रश्नाची छापील प्रश्नपत्रिका देण्यात आली. विचारलेल्या प्रश्नांना उत्तर लिहून ती प्रश्नपत्रिका संस्थेला देण्यात आली.अशा प्रकारे थोडक्यात Top Management review देण्यात आला. सर्वांनी संस्थेत कार्यरत असलेला वार्षिक अनुभव सांगून त्याबद्दल भावना व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




Post a Comment

Previous Post Next Post