डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात २३ एप्रिल रोजी एका अज्ञात मयत व्यक्तीची नोंद करण्यात आली.मात्र ओळख होत नसल्याने डोंबिवली रेल्वे पोलिसांनी शोध सुरू केला.पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.पोलिसांची शोधनजर मयताच्या शर्टावर गेली.पोलिसांनी हाच धागा पकडत त्या दिशेने शोध सुरू केला.तपासात या व्यक्तीची ओळख पटली.मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीकडे मृतदेह ताब्यात दिला.
२३ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कर्जत लोकलमध्ये एक व्यक्ती मृत अवस्थेत पडल्याचे डोंबिवली रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले होते.रेल्वे पोलिसांनी सदर लोकलमधील मृत व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेतला.
मृत व्यक्तीच्या शर्टाच्या कॉलरवर फॅशन टेलर वांगणी वेस्ट असे लिहिले दिसले.मृत्यू व्यक्तीच्या वारसांचा शोध घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पाटील यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पिंगळे यांच्या मदतीने वांगणी येथील फॅशन टेलरचा मोबाईल क्रमांक मिळवला.
पोलिसांनी टेलरला मयत व्यक्तीचा फोटो पाठवला असता ओळखले की हा व्यक्ती याच परिसरात राहणारा असल्याचे सांगितले. मेहबूब नासिर शेख ( 57, रा. रूम नंबर ०५, लक्ष्मी अपार्टमेंट वांगणी पश्चिम जिल्हा ठाणे ) असा आहे.मेहबूब यांच्या पत्नीला याची माहिती दिली असता कळविले असता त्यांनी पालिकेच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटल येथे पतीचा मृतदेह ओळखून ताब्यात घेतला.