तितली' मध्ये तितलीला बघून दर्शकांना आठवेल 'जब वी मेट' मधली 'गीत'

स्टारप्लस आपल्या प्रेक्षकांसाठी 'तितली' नावाची एक अनोखी आणि यापूर्वी कधीही न पाहिलेली प्रेमकथा घेऊन येत आहे. ही कथा आपल्या मनातील प्रेम या संकल्पनेचाच पुनर्विचार करायला लावते की, खरंच प्रेम असं असतं का?

स्टारप्लस नवीन प्रतिभांना संधी देण्यासाठी परिचित आहे. 'तितली'मधून नेहा सोलंकीच्या रूपाने असाच एक नवा, प्रतिभावान चेहरा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहा सोलंकी ही एक प्रतिभावान अभिनेत्री असून 'तितली' मध्ये उत्तम कामगिरी साकारण्यास सज्ज झाली आहे. एका महत्त्वाकांक्षी तरुणीपासून एका भावनिक, कोमल अशा पात्राच्या विविध छटा प्रेक्षकांना यातून पाहायला मिळतील. 

नेहा 'तितली'च्या शीर्षक भूमिकेत दिसणार आहे. तितली ही एक वेधक प्रेमकथा आहे ज्यामध्ये तितली नावाची आनंदी, नटखट मुलगी तिच्या स्वप्नांचा राजकुमार शोधते आहे. परिकथेतील स्वप्नांप्रमाणे ती आपले आयुष्य गुलाबी करण्याच्या प्रयत्नांत आहे.

करीना कपूर खानने जब वी मेट या चित्रपटात गीतची भूमिका साकारली होती. गीतच्या पात्राशी लाखो तरुणी जोडल्या गेल्या आहेत. गीत तरुण, उत्साही आणि निखळ अशी मुलगी होती. त्याचप्रमाणे स्टार प्लस च्या आगामी तितली या मालिकेत  नेहा सोलंकी साकारत असलेले तितली ही व्यक्तिरेखा जब वी मेट मधल्या 'गीत'सारखी आहे. तितली 'गोल्डन हार्ट' मुलगी आहे असे म्हणता येईल आणि गीतप्रमाणेच तितलीही तिच्या 'मिस्टर राईट'च्या शोधात आहे.

स्टारप्लसच्या 'तितली' मालिकेत तितलीचे पात्र साकारणारी नेहा सोलंकी म्हणते, "मी खूप आनंदी आहे की मी तितलीच्या रुपात

गीतसारखे पात्र साकारते आहे. तितलीचे पात्र खूप रंगीबेरंगी आहे. माझ्या कुटुंबाने मला मी गीतसारखीच आहे, असे सांगितले आणि अनेक वेळा मी देखील स्वत: बद्दल असा अनुभव घेतला आहे. गीत आणि तितली दोघेही त्यांच्या परिपूर्ण जीवनसाथीच्या शोधात आहेत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करू इच्छितात. मला ‘जब वी मेट’ हा चित्रपट खूप आवडतो. जेव्हा मी खूप थकलेली असते किंवा मी खूप उदास असते तेव्हा तेव्हा मी हा चित्रपट पाहते. हा माझ्यासाठी स्ट्रेसबस्टर सिनेमा आहे. एखाद्या गाण्यासारखे असलेले तितलीचे पात्र साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे जे यातील गीत सारखे आहे. मला आशा आहे की मी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करू शकेन. तितलीची निर्मिती स्टोरी स्क्वेअर प्रॉडक्शनने केली आहे. तितलीचे प्रसारण स्टार प्लसवर 6 जून रोजी सोमवार ते रविवार रात्री 11 वाजता होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post