डोंबिवलीत दुधात पाण्याची भेसळ

 


दुधातील भेसळ शिवसेना पदाधिकाऱ्याने केली उघड 

डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील टेम्पो नाका परिसरात एका इमारतीमध्ये बंद दाराआड दुधात पाणी टाकून भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना पदाधिकारी महेश पाटील यांनी उघडकीस आणला.दुधात पाणी टाकून हे भेसळयुक्त दूध तो विक्री करत असल्याचे पाटील यांना समजले होते.पाटील यांनी या ठिकाणी पाहणी केली असता दुधात पाणी भेसळ होत असल्याचे पाहिले.भेसळ करणाऱ्याला टिळकनगर पोलिसांनी अटक केली आहे.

   रमेश वणपती असे अटक केलेल्याचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडवरील टेम्पो नाका परिसरातील मोहन प्लाझा बिल्डिंग मध्ये दुधात भेसळ होत असल्याची माहिती शिवसेनेचे तालुका प्रमुख महेश पाटील यांना मिळाली होती.महेश पाटील यांनी पहाटे ५ च्या सुमारास त्याठिकाणी छापा टाकला असता

नामांकित कंपनीच्या दुधात पाणी टाकून भेसळ करत असल्याचे दिसून आले . महेश पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती टिळकनगर पोलिसांना दिली. दुधात भेसळ करणाऱ्या रमेशला पोलिसांनी अटक केली आहे.रमेशकडे पोलिसांनी चौकशी असता तो मागील ३ महिन्यात दुधात भेसळकरून विक्री करत असल्याचे उघड झाले .पोलिसांनी सदर जागेवरून भेसळयुक्त दूध हस्तगत केले असून रमेश विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.


#दूध भेसळ #नागरिकांच्या जीवाशी खेळ#शिवसेना पदाधिकारी महेश पाटील#टिळकनगर पोलिसांची कारवाई # डोंबिवली पूर्व

Post a Comment

Previous Post Next Post