डोंबिवली पश्चिमेकडील घटना
गाडीचालकास नागरिकांनी दिला चोप..
प्रवासी व दुचाकीस्वार जखमी
डोंबिवली / शंकर जाधव : बुधवारी रात्री साड़े आठ ते नऊ वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्रनगर ते श्रीधर म्हात्रे चौक, नवापाडा मारुती मंदिर , लोकप्रिय विद्यालय, दोन पाण्याची टाकी, उमेशनगर चौक ते विष्णूनगर पोलिस ठाणे समोर एका Mhodk0911 ही चारचाकी गाडीने ११ गाडींना धडक दिली.यात नऊ जण जखमी झाले.यात दुचाकीवरील तीन महिला जखमी झाल्या. रिक्षालाही धडक दिल्याने तीन ते चार प्रवासी जखमी झाले.धडक दिलेल्या चारचाकी वाहनचालकाला नागरिकांनी चोप देऊन विष्णुनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.पोलिसांनी गाडीचालकास ताब्यात घेतले आहे.
Tags
महाराष्ट्र गुन्हे