डोंबिवली / शंकर जाधव : दारू पिण्याचे व्यसन असल्याने डोक्यावर कर्ज उतरविण्यासाठी त्याने काम करत असलेले दुकानाच लुटल्याचे ठरविले.दुकानाची सर्व माहिती असून त्याला चोरी करन सहज शक्य होते.रात्रीच्या वेळी तो कामगार तोंडावर रुमाल बांधून दुकानाचे शटर उचकटले.दुकानात प्रवेश करून बनावट चवीने लॉकर मधील ८०,२७५ रुपये घेऊन पसार झाला.ही घटना सीसीटीव्हीत कॅमेरात कैद झाली होती.डोंबिवली रामनगर पोलिसांनी चोरी करणाऱ्या कामगाराला अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय अशोक मणतोडे २९ रा. गोग्रासवाडी , डोंबिवली पूर्व असे अटक केलेल्या कामगारांचे नाव आहे.डोंबिवली पूर्वेकडील चिपळूणकर रोडवरील डॉमिनोज पिझ्झा हॉटेलमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली होती. याच दुकानात काम करत असलेल्या विजयला दारू पिण्याचे व्यसन असून त्याने अनेकांकडून कर्ज घेतले होते. याच सवयी विजयला दुकानातून काढण्यात आले होते.कर्ज उतरविण्यासाठी विजयने शक्कल लढवत याच दुकानात चोरी करण्याचे ठरविले.विजयने दुकानातील शटर उचकटून बनावट चवीने हॉटेलचे लॉकर उघडून त्यातील ८०,२७५ रुपये इतकी रोख रक्कम चोरली.याप्रकरणी हॉटेलच्या व्यवस्थापक अमित वाल्मिकी यांनी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.पोलिसांनी हॉटेलच्या आजपास दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता विजय दुचाकीवरून चोरी करण्याच्या काही वेळेआधी दुकानाच्या आसपास फिरत असल्याचे कॅमेरात कैद झाले होते.पोलिसांनी संशयावरून विजयला ताब्यात घेतले असता विजयने दुकानात चोरी केल्याचे कबूल केले असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.विजयने हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले होते व चोरी करताना रेकॉडरही बंद केले होते.