डोंबिवली / शंकर जाधव : लाकडी दांडक्याने दोघांनी मित्राला जीवे ठार मारून हत्या लपविण्यासाठी खिडकीतून बाहेर फेकले. दारुवाल्याला चुगली लावण्याच्या कारणावरून ही हत्या झाली असून या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघा मारेकऱ्यांना अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दादू मटू जाधव उर्फ पाटील व विनोद पडवळ असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत.राजेश रामवृक्ष सहानी असे हत्या झालेल्याचे नाव असून तो मूळच उत्तरप्रदेश मधील होता.राजेश हा बिगरीचे काम करत असून तो दादू , विनोद यांच्यासोबत कधी कधी दारू पियायचा.२५ तारखेला तिघांनी एकत्र जेवण केले.रात्री ११वाजण्याच्या सुमारास दादूने राजेशला राहत्या घरी सोनारपाडा येथील साईश्रद्धा इमारतीत नेले.विनोदी त्याच्यासोबत घरी निघाला.तिघे घरी आल्यावर दादूने राजेशला दारुवाल्याला चुगली लागल्याच्या कारणावरून जाब विचारला.दादू आणि विनोद या दोघांनी राजेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यानंतर दोघांनी राजेशला लाकडी दांडक्याने मारहाण केली.यात राजेश जागीच मरण पावला.दोघांनी राजेश मरण पावल्याची खात्री करून घरातील खिडकीतून बाहेर फेकले.पुरावा नष्ट करण्यासाठी दोघांनी घरातील रक्ताचे दाग पुसले.य प्रकरणी मानपाडा पोलिसांनी दादू आणि विनोद या दोघांना बेड्या ठोकून गजाआड केले.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर जयजीत सिंग, पोलीस स ठाणे शहर दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण महेश 1. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, मा. सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवल . सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिरी गुन्हे बाळासाहेब पवार तुल लंबे, सपोनि अविनाश वनवे, सपोनिरी. सुरेश डांबरे, सपोनिरी. सुनिल तारमळे, सपोनिरी. श्रीकृष्ण गोरे, पोहवा राजकुमार खिलारे, पोहवा शिरीष पाटील, पोहवा सुनिल पवार, पोहवा दिपक गडगे, पोहवा विका शांताराम कसबे, पोना प्रविण किनरे, यलप्पा पाटील, देवा पवार,अनिल घुगे गोक आहेर, पोशि विजय आव्हाड, विनोद ढाकणे महेंद्र मंजा यांचे पथकाने केली आहे.
#मित्रांनी केली मित्राची हत्या #मानपाडा पोलीस # दोघे अटकेत # डोंबिवलीतील घटना