१२ कुटुंबीयांचे एमआयडीसी कार्यालयात हेलपाटे
डोंबिवली / शंकर जाधव : एमआयडीसीची पाईपलाईन फुटून घरात पाणी शिरून सामानाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून याचा सर्व्हे होऊन दोन वर्षे उलटली. सर्व कागदपत्रे तपासली व नुकसानभरपाई देऊ असे आश्वासन एमआयडी विभागाकडून कुटुंबीयांना ना देण्यात आले. मात्र अजूनही या १२ कुटुंंबीयानी नुकसानभरपाई मिळावी नसल्याने हे कुटुंबीय डोंबिवलीतील एमआयडीसी कार्यालयाचे हेलपाटे मारत आहेत. शुक्रवारी या कुटुंबीयांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली असता पुन्हा आश्वासन देण्यात आले.
२८ मे २०२१ रोजी काटई येथील पाईपलाईन फुटून जवळील अनेक घरात पाणी शिरले. यात घरातील सर्व सामानाचे नुकसान झाले. प्रशासनाकडून या घरांच्या नुकसानभरपाई सर्व्हे करून माहिती घेण्यात आली. घरातील कुटुंबीयांची नावे घेऊन सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्याचे बाधित कुटुंबियांपैकी गुरुनाथ पाटील यांनी सांगितले. एमआयडीसीने १२ कुटुंबियांना नुकसानभरपाई देऊ असे आश्वासन देण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. दोन वर्षे उलटली तरी या कुटुंबियांना आश्वासयाशिवाय काहीच मिळाले नाही. अखेर शुक्रवारी या कुटुंबीयांनी डोंबिवलीतील एमआयडीसी विभागात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारण्याचे ठरविले. कुटुंबीयांनी कार्यकारी अभियंता एस.पी.आव्हाड यांची भेट घेतली. यावेळी गुरुनाथ पाटील म्हणाले, आणखी किती वर्षे आम्ही वाट पाहणार ? प्रशासनाने नुकसानभरपाई जाहिर केली मग आपण का देत नाही असे विचारले. यावर आव्हाड यांनी सोमवारी यावर पुन्हा कागदपत्राची तपासणी करू आणि नुकसानभरपाईबाबत कुटुंबीयना कळवू असे सांगितले.
दरम्यान, प्रशासनाच्या दिरंगाईने १२ कुटुंबीय तब्बल दोन वर्षे एमआयडीसी विभागाचे हेलपाटे मारत आहेत. गरीब जनतेला अशाप्रकारे सरकारी कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारावे लागत असून दोन वर्षे प्रशासन काय करीत होते ? असा प्रश्न कुटुंबियांनी उपस्थित केला.
Tags : # डोंबिवली एमआयडीसी # राज्य सरकारचा नाकर्तेपणा # स्थानिक नेत्यांचे दुर्लक्ष