डोंबिवली/ शंकर जाधव : अविनाश चौधरी या विद्यार्थ्याने डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अविनाशने महाराष्ट्र सीईटी परीक्षेत 100 टक्के गुण मिळविले. या परीक्षेत महाराष्ट्रातून २८ जण पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले असून अशा यादीत अविनाशनेही नाव आहे.शिक्षणाची आस, इंजिनिरिंगचा ध्यास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत अविनासने अभ्यासाला सुरुवात केली.
अविनाश हा रॉयल महाविद्यालयाचा विद्यार्थी असून. त्याने महाविद्यालया समवेतच ॲलन या इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर अभ्यास करताना अविनाश अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास केला. अभ्यासात सातत्य ठेवले की परीक्षेच्या शेवटी कोणताही त्रास होत नाही असे त्याने सांगितले. नऊवी नंतर त्याने टिव्ही बघितला नसल्याचे सांगितले. थोडावेळ खेळायला बाहेर जात असे असेही त्याने सांगितले. तर अविनाशचे शिक्षक गणेश देसाई म्हणाले, विद्यार्थ्यांनी रात्रीची सात आठ तास झोप घेणे गरजेचे असून रोज एक तास खेळणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर उरलेला सर्व वेळ अभ्यासासाठी देणे महत्त्वाचे आहे. एकंदरीतच सातत्य, चिकाटी, जिद्द असली की कोणतीही अवघड परीक्षाही सहज रित्या पार करू शकतो असा संदेश अविनाशने दिला. यापुढे त्याला इंजिनियर व्हायचे असून आयआयटी मुंबई येथे प्रवेश मिळेल अशी आशा असल्याचे अविनाशने सांगितले.
