भाजप - शिवसेना ( शिंदे गट ) ची जुनी खेळी

 मनसे आमदार राजू पाटील 

  डोंबिवली / शंकर जाधव : २०१४ आणि २०१९ साली शिवसेना – भाजपा युतीचा उमेदवार कल्याण लोकसभा मतदार संघातून निवडणून आला. आता पुन्हा २०२४ च्या लोकसभा मतदार संघ निवडणुकीआधी भाजपा – शिवसेना ( शिंदे ) गट पटत नसल्याचे दाखवून लोकांचे लक्ष आपल्याकडे वळविण्याची खेळी असल्याचा संशय आहे. आताही त्याच पद्धतीने खेळी सुरु असून पुन्हा हे दोघे पक्ष एकत्र येईल आणि कल्याण लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचाच उमेदवार जिंकून येईल असे मत मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यानी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

    डोंबिवली पूर्वेकडील सावित्रीबाई फुले कलामंदिर येथे मनसेचा प्रशिक्षण शिबिरात मनसे नेते अनिल शिदोरे आणि धनंजय खाडिलकर व मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील यांनी मनसैनिकांना मार्गदर्शन केले. मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदार संघात मनसेचे काम उत्तम सुरु असल्याचे सांगितले.त्यांनतर मनसे आमदार राजू पाटील यांना पत्रकारांनी कल्याण लोकसभा  मतदार संघाबाबत विचारले असता त्यांनी शिवसेना ( शिंदे गट ) आणि भाजपा यांची जुनी खेळी असून ती यशस्वी होताना दिसत असल्याचे सांगितले.जनतेचे लक्ष आपल्याकडे वळविण्यासाठी वाद असल्याचे दाखवायचे आणि निवडणुकीत एकत्र यायचे असे खेळ सुरु आहे.

 

 वारकरीबाबत जे घडल त्याकडे गृहखात्याने लक्ष दिले पाहिजे

      पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या बाबत जे घडले ते निद्नीय आहे. वारकरी इतिहासात अशी घटना घडली नाही. चार जणांना बाजूच्या खोलीत मारले. वारीत एकप्रकारची शिस्त असते. पोलीस नसले तरी वारकरी शिस्तीचे पालन करतात. मात्र तिकडे  जे घडले ते त्यात वारकऱ्यांबाबत जास्तच अमानुषपणे वागले. त्याचा आम्ही निषेध करतो.     

दोन्ही पक्षात एकमेकांबाबत मतभेद

    २०१४ च्या कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून डॉ. श्रीकांत शिंदे यांना उभे केले होते. ती निवडणूक शिवसेना –भाजपा युतीतून लढविण्यात आली होती. २०१४ विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना –भाजपने एकत्र निवडणूक लढविली नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही या दोन्ही पक्षाने वेगळे लढविणे पसंत केले. त्यानंतर सत्तास्थापनेसाठी शिवसेना-भाजपाने युती केली. २०१९ च्या कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत युतीतून पुन्हा डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने जिंकून आले. आता जरी शिवसेना भाजप एकत्र आले असले तरी ठाणे लोकसभा मतदार संघ आणि कल्याण लोकसभा मतदार संघ भाजपचा आहे असे आमदार संजय केळकर यांनी ठामपणे सांगितले. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षात एकमेकांबाबत मतभेद असल्याने या दोन्ही पक्षाने पटत नाही असे कल्याण येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यातून स्पष्ट होते. मात्र यावर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी घेऊन दोन्ही पक्षात काहीही वाद नसल्याचे स्पष्ट करत स्वतः लक्ष देणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावर एकमत असल्याचे सांगितले.



Post a Comment

Previous Post Next Post