डोंबिवली / शंकर जाधव : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा संस्थापक राज ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त नुकतेच पूर्वेकडील पाथर्ली येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका मंदा पाटील आणि गावदेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष गंगाराम पाटील यांनी गरजू गोरगरीब विद्यार्थ्यांकरीता मोफत वह्या वाटप केले. विद्यार्थ्यांना आमदार राजू पाटील यांनी स्वतः वह्या देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
मोफत वह्या वाटप कार्यक्रमसाठी आमदार राजूदादा पाटील, प्रकाश भोईर (जिल्हाध्यक्ष), राहुल कामत - (जिल्हासंघटक), सुदेश चुडनाईक (उपजिल्हाध्यक्ष), योगेश पाटील,मिलिंद म्हात्रे, (विद्यार्थी सेना डोंबिवली शहराध्यक्ष), अविनाश चिखले (वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष), दीपक शिंदे, कोमल पाटील (डोंबिवली शहर सचिव), प्रतिभा पाटील (शहर संघटक), सपना पाटील (उपशहर अध्यक्षा), स्मिता भणगे (उपशहर संघटक), शलाका कानडे, दर्शना कानडे, अश्विनी चौघुले आदी मान्यवर उपस्थित होते..
पाथर्ली येथील मनसेच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मोफत वह्या वाटप कार्यक्रमात गरजू व गरीब विद्यार्थ्यांना वह्या मिळतात विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. सदर मोफत वह्या वाटप यशस्वी करण्यासाठी ललित पाटील (शाखाअध्यक्ष), गणेश मगरे, साचिन मयेकर संजय जाधव, तेजस जाधव (उपशाखाध्यक्ष), अमन गायकवाड, ऋतिक जाधव ऋतिक गायकवाड कुणाल ठोंबरे, सुनील शेलार यज्ञेश पाटील, महिंद्र पाटील, अंजना भोईर, मेघा चोरगे, दिपिका वालेकर अर्चना गायकवाड, कीर्ती मगरे, सावित्रीबाई गायकवाड, निर्मला पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.