डोंबिवली / शंकर जाधव :
सोनसाखळी, मोबाईल, मोटार सायकल चोरट्याला पकडून गजाआड करण्यास मानपाडा पोलिसांना यश आले आहे. या चोरट्याला शहाड येथे पोलिसांनी सापाला रचून पकडून बेड्या ठोकल्या. मानपाडा, कळवा पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, मध्यवर्ती पोलीस स्टेशन, नारपोली पोलीस स्टेशन, कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हददीत अटक आरोपीने साथीदाराचे मदतीने चेन स्नॅचिंग, मोबाईल स्नॅचिग, मोटार सायकल चोरी केली होती.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुस्तफा उर्फ मुस्सु जाफर सैयद उर्फ इराणी ( वय २४, रा. अनिल भगत चाळ, रूम नंबर ४, मंगल नगर अंबिवली पश्चिम ता. कल्याण) असे अटक केलेल्या चोरट्याच नाव आहे. चोरट्याकडून ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ८ मोटार सायकली, ५ मोबाईल फोन असा एकुण ४ लाख, २५ हजार रुपये किमंतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे
डोंबिवली पूर्वेकडील भोपर रोड नांदीवली राहणारे शरद कडुकर हे शनिवार 3 जून रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास भोपर कमानीजवळून पायी चालत होते.मुस्तफा उर्फ मुस्सु याने कडूकर त्यांच्याकडील मोबाईल जबरीने खेचून पळ काढला. याप्रकरणीकडूकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. गुन्हे प्रकटीकरण पथकाने मुस्तफा उर्फ मुस्सु शहाड भागात सापळा रचला. मुस्तफा उर्फ मुस्सु मोटार सायकल घेण्यासाठी शहाड रेल्वे स्टेशन परिसरात आला असता पोलिसांनी त्याला अटक केली.मुस्तफा उर्फ मुस्सु विरोधात महात्मा फुले पोलीस स्टेशन, कोळसेवाडी पोलीस ठाणे, खडकपाडा पोलीस ठाणे, मानपाडा पोलीस स्टेशन, डोबिवली पोलीस स्टेशनमध्ये २१ गुन्हे दाखल आहेत.
सदर कामगिरी पोलीस उप आयुक्त परिमंडळ- ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त डोबिवली विभाग सुनिल कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल तारमळे, सपोउपनिरी भानुदास काटकर, पोलीस हवालदार राजकुमार खिलारे, शिरीष पाटील, सुनिल पवार, संजु मासाळ, विकास माळी, पोलीस नाईक यल्लापा पाटील, देवा पवार, पोलीस शिपाई अशोक आहेर, विजय आव्हाड, महेद्र मंझा यांच्या पथकाने केली.