डोंबिवली / शंकर जाधव : भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्ष वाढीसाठी तसेच निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणावर विजय संपादन करण्यात यावा या उद्देशाने लोकसभा व विधानसभेच्या निवडणूक प्रमुखांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कल्याण ग्रामीण विधानसभा नंदू परब, डोंबिवली विधानसभा प्रज्ञेश प्रभुघाटे, अंबरनाथ विधानसभा गुलाबराव करणजुळे पाटील, यांची लोकसभा व विधानसभेच्या निवडणुक प्रमुखपदी निवड केली आहे.
याबाबत नंदू परब म्हणाले, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रासाठी पक्षाने माझ्यावर संघटनात्मक जबाबदारी दिली आहे, ती परिपूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे. या कल्याण ग्रामीणमध्ये संघटना कशी वाढेल, आमदार म्हणून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणे याची पूर्ण तयारी करणार. पक्षाच्या माध्यमातून सदस्यांची नोंदणी होत असतेच, प्रत्येक बूथपर्यंत कसे पोहचता येईल, प्रत्येक कार्यकर्ता ॲक्टिव्ह कसा केला जाईल याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे परब यांनी म्हटले आहे.
