डोंबिवली / शंकर जाधव: संजय राऊत यांनी कल्याण लोकसभा मतदान संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वक्तव्यचा शिवसेना शिंदे गटाकडून जाहीर निषेध करण्यात आला.डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाच्या मध्यवर्ती शाखेसमोर राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले.
या आंदोलनात युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे,उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, सागर जेधे, सागर दुबे यांसह संजय राऊत यांच्या फोटोवर थुंकून निषेध व्यक्त केला.यावेळी युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे म्हणाले, संजय राऊत यांची दिवसेंदिवस पातळी ढासळली आहे.ते आता लोकशाहीला मातीला मिळवत आहेत.समाजासाठी काम करत असलेल्या खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा संजय राऊत यांनी धसका घेतला आहे.संजय राऊत यांना त्यांच्या घरातील लोकही विचारत नाहीत.माझी मीडियाला विनंती आहे, की संजय राऊत यांची बाईट घेऊ नये.