एल. आय. सी. विकास अधिकारी उमेश चव्हाण ३० जूनला सेवेतून निवृत्त

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  भारतीय आयुर्विमा महामंडळ डोंबिवली शाखेतून उमेश चव्हाण ३६ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दनंतर ३० जून २०२३ रोजी निवृत्त होत आहेत. विकास अधिकारी असताना त्यांनी एकापेक्षा एक विक्रम स्थापित केले. त्यांच्याकडे १०० पेक्षा अधिक एजंट असून त्यांनी अनेक एजंटांना करोडपती, लखपती बनविले.१९९९ पासून सलग २४ वर्ष ते डोंबिवली शाखेमध्ये पॉलिसीचा प्रथम क्रमांकावर आहेत. २०२२-२३ या आर्थिक वर्षात त्यांनी ठाणे आहे. विभागामध्ये सिंगल प्रीमियममध्ये वरच्या क्रमांकावर होते.

 उमेश चव्हाण हे एक दिलखुलास, मनमिळावू स्वभाव व नेहमी आनंदी व्यक्तिमत्व.त्यांच्या या कारकीर्दीत त्यांच्या यशामध्ये विमा प्रतिनिधी विनय तिरोडकर, विजय महालकर, जितेंद्र टोकरे, मीना पाटील, विद्या काळे, रमेश प्रताप पाचपुते, योगेश्वर शर्मा, अतुल सावंत, अमित पारकर, प्रवीण दिवटे, ज्योती चाफेकर, स जे डिसुझा, संदेश सुर्वे, सत्यवान कविटकर, मिलिंद मोहिते, अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राजशेखर, संतोष कनोजिया या विमा प्रतिनिधींचा सिंहाचा वाटा आहे. चव्हाण यांनी 'जीवन आधार' या सामाजिक संस्थेची स्थापना करून सामजिक कार्यात आपला ठसा उमटवला आहे. ही संस्था आदिवासी भाग व आचार्य भिसे शाळा येथे काम करते. चव्हाण रोटरी आंतरराष्ट्रीय संस्था ठाणे जिल्हा यामध्ये खूप सक्रिय असून अध्यक्ष यापासून ते पुढच्या वर्षी रोटरी जिल्हा मुख्य संपर्कप्रमुख या पदावर कार्यरत होणार आहेत. 

रोटरी तर्फे त्यांनी २०१५-१६ साली डोंबिवली येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित केला होता. तसेच २०१४-१५ या त्यांच्या अध्यक्षीय वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी रोटरीतर्फे पीस कॉन्फरन्स भरवली होती.उमेश चव्हाण यांना २०१६ साली त्यांना 'राजीव गांधी पुरस्कार' ठाणे काँग्रेस सेवादलतर्फे मिळाला आहे. दै. अंबरनाथ जनमत तर्फे 'जनमत वैभव पुरस्कार' देऊन २०२२ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

उमेश चव्हाण हे कॉलेज ऑफ क्लब लीडर्स या संस्थेचे २०२१-२२ साली त्यांनी अध्यक्षपद भुषविले. या कार्यकाळामध्ये त्यांनी चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे तसेच फडके अकॅडमीचे मुख्य मार्गदर्शक सतीश फडके व निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर असे सुप्रसिद्ध वक्ते त्यांनी आपल्या कार्य काळामध्ये आणले होते.त्यांच्या या निवृतच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात  आहे.

Post a Comment

Previous Post Next Post