स्पेशल ऑलिंपिक फुटबॉल स्पर्धेत सेजल जेसवालला कास्य पदक

डोंबिवली ( शंकर जाधव ) 

डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडीतील क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थीनी सेजल जेसवाललने जर्मनी, बर्लीन येथे झालेल्या स्पेशल ओलिंपिक फुटबॉल स्पर्धेत कास्य पदक पटकाविले.

 ऑल गेम्समध्ये भारताला एकूण 202 पदके मिळाले आहे. बुधवारी भारतीय टीम दिल्ली विमान तळावर दाखल झाली आहे. ठाणे जिल्ह्यातून डोंबिवली येथील क्षितिज शाळेची विद्यार्थीनी सेजल जेसवालवर हिचे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेच्या संचालिका अनिता दळवी , मुध्यापिका व शिक्षकवर्गाने सेजलला या स्पर्धेत सुयश मिळावे याकरता खूप मेहनत घेतली.



Post a Comment

Previous Post Next Post