डोंबिवली / शंकर जाधव : विशेष मुलांची काळजी घेणे, त्यांच्या कलेने त्यांना शिक्षण देणे आणि त्यांच्यामध्ये जिद्द निर्माण करणे या सर्व गोष्टी खूप अवघड असतात. मात्र जिद्द, चिकाटी या शब्दाचा अर्थ विशेष विद्यार्थी असणाऱ्या समृद्धी कुलकर्णीच्या मनात रुजवला नी दहावीच्या परीक्षेत ८२ टक्के गुण मिळाले.डोंबिवतील स. वा. जोशी शाळेतील विशेष विद्यार्थी म्हणून समृद्धीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
समृद्धी कुलकर्णी तब्बल 83 टक्के मिळवून तिने आपल्या पालकांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे.लहानपणापासून विविध गोष्टींची आवड समृद्धी मध्ये निर्माण केली. समृद्धी विशेष पाल्य असल्याचे लक्षात आल्यानंतर तिच्यासाठी विविध गोष्टी, तिच्या आवडी निवडी , तिला तिच्या पायावर उभे करणे, थोडे चालायला शिकविले. या शिवाय तिचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी समृद्धीचा स. वा. जोशी शाळेत प्रवेश घेतला. तिच्या शिक्षणाचे स्वप्न आम्ही पाहत होतो. मात्र आमचे हे स्वप्न तिने तिच्या दहावीच्या टप्प्यावर पूर्ण केले असे समृद्धीची आई सांगते. तिचे शिक्षक दोन तास घरी येऊन तिला शिकवत होते. तर शाळेतील शिक्षकांनीही लहानपणापासूनच तिच्यावर विशेष मेहनत घेतली असे तिची आई सांगते.
विशेष मुलांसाठी बोर्डाकडून काही वेगळे विषय...
विशेष मुलांसाठी मराठी, इंग्रजी, फिजिओलॉजी हायजीन अँड होम सायन्स,सोशल सायन्सेस, एरिथमॅटिक , कुकरी असे विषय असतात. कुकरी मध्ये समृध्दीने स्वतःच्या हाताने उत्कृष्ठ सँडविच बनवले होते. त्याचबरोबर बाकीच्या विषयांचा अभ्यास तिच्याकडून करून घेतला जात होता.