डोंबिवली ( शंकर जाधव ) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मनसे नेते व आमदार राजु पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर व शहराध्यक्ष मनोज घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यार्थी सेना शहराध्यक्ष मिलिंद मदन म्हात्रे यांच्या सहकार्याने महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना डोंबिवली शहराच्यावतीने शहरात १०५५ गुलाब फुलझाडांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी दिप्तेश नाईक,प्रितेश म्हामूणकर,सागर केंजळे, सुहास काळे, प्राजक्ता देशपांडे,कुणाला मोर्ये, उदय वेळासकर, मयुरेश उतेकर, मनीष धनावडे,रोहित कदम, संजय सरमळकर , राज जमदाडे, तसेच अनेक महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र