मुंबई : फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने अद्वितीय कौशल्य व नाविन्यतेसह उद्योगाचे नेतृत्व करत ‘मार्केट का मार्केट लीडर’ म्हणून आपले स्थान अधिक दृढ केले आहे. आपल्या कामगिरीच्या माध्यमातून नेतृत्व गुण दाखवत कंपनीने बोर्डमध्ये अव्वल स्थानासह बाजारपेठेतील अग्रणी व विश्वसनीय कंपनी म्हणून स्वत:ला स्थापित केले आहे.
एंजल वनचा २१,५०० हून अधिक ऑथोराईज्ड पर्सन्सचा सर्वात मोठा समूह आहे. तसेच एनएसई डेटानुसार एंजल वन ४.३ दशलक्ष अॅक्टिव्ह क्लायंट्स असलेली तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या १४.६ दशलक्ष प्रबळ क्लायंटवर्गाने मे २०२३ मध्ये एकूण मार्केट शेअर २३.९ टक्क्यांपर्यंत नेला आहे, ज्यामुळे कंपनी अव्वल तीन कंपन्यांमध्ये सामील झाली आहे. सुपर अॅपमधील सातत्यपूर्ण सुधारणांसह एंजल वनने पुन्हा एकदा तंत्रज्ञान व क्लायंट-केंद्रित कंपनी असल्याचे दाखवून दिले आहे.
गेल्या तीन दशकांमध्ये एंजल वनने सतत नाविन्यतेला चालना देत आणि रिटेल ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञान व ट्रेडिंग संधींसह सक्षम करत अपवादात्मक नेतृत्व दाखवले आहे. कंपनी नेहमी ग्राहकांच्या सहानुभूतीने संचालित आहे, हे मार्केट लीडरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कंपनीच्या अग्रणी कृती आणि उद्योगामधील नेतृत्वाच्या लक्षणीय पॅरामीटर्समधील अव्वल स्थान एंजल वनला विश्वसनीय फिनटेक कंपनी आणि मार्केट लीडर बनवतात.