दोन जिवंत काडतूस हस्तगत
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण मधील साकेत महाविद्यालयाजवळ पोलिसांनी सापळा रचून एका गुंडाला पिस्तुलासह अटक केली.अटक केलेल्या तरुणाकडे पोलिसांना दोन जिवंत सापडली. हा गुंड कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रेकोर्डवरील आरोपी असून त्याच्यावरखुनाचा प्रयत्न असे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मन्या उर्फ मनोज बसवराज यादव असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.हा गुंड कल्याणमधील साकेत महाविद्यालयाजवळ येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखमुख यांनी सहायक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे व गुन्हे प्रगटीकरण पथकाला घेऊन साकेत महाविद्यालयाजवळ सापळा रचला.मन्या हा महाविद्यालयाजवळ आला असता पोलिसांनी त्याच्यावर झडप घातली.मन्या पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांना त्याला बेड्या ठोकून अटक केली. पोलिसांनी मन्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी पिस्तुल आणि जिवंत काडतुस जप्त केले असून मन्यू गुन्हा करण्याच्या उद्देशाने आला असल्याचा पोलिसांचा संशय आहे.
