मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी दिवा भाजप भरवणार अनधिकृत बांधकामांचे प्रदर्शन - रोहिदास मुंडे

दिवा/ आरती मुळीक परब: पुराव्यांसह तक्रारी करूनही पालिका प्रशासन दिव्यातील अनधिकृत बांधकांनावर कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ दिवा भाजप मुख्यमंत्री दिव्यात येतील त्या दिवशी अनधिकृत बांधकामचे प्रदर्शन भरवणार असल्याची माहिती भाजपचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिली आहे.

दिव्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या आर्थिक हितसंबंधातून हे शहर बकाल होत असून येथील नागरिकांना प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. स्लॅब मागे ३ लाख रुपये घेऊन दिवा शहरात अनधिकृत बांधकामे जोमाने सुरू आहेत. याला आयुक्त, पालिका अधिकारी प्रितम पाटील आणि दिव्यातील शिवसेनेचे नेते जबाबदार आहेत असा आरोप रोहिदास मुंडे यांनी केला आहे. शहरात पाण्याचा मोठा प्रश्न असतानाही पिण्याचे पाणी अनधिकृत बांधकामांना देऊन येथील प्रशासन व स्थानिक शिवसेना आर्थिक लाभासाठी अनधिकृत बांधकामाचा भस्मासुर उभा करत आहेत. याबाबत वारंवार तक्रारी देऊनही पालिका प्रशासन अर्थपूर्ण संबंधामुळे अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत नसल्याच्या निषेधार्थ ही गंभीर बाब राज्याचे मुख्यमंत्री व राज्याच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दिवा दौऱ्यावेळी दिव्यात अनधिकृत बांधकामांचे प्रदर्शन भरवण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी जाहीर केला आहे. एकीकडे क्लस्टर योजना होत असताना दुसरीकडे अनधिकृत बांधकाम जोमाने वाढत असल्याने क्लस्टर योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचेही रोहिदास मुंडे यांनी म्हटले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post