डोंबिवली ( शंकर जाधव ) गरीब विद्यार्थांना शिक्षण घेताना शालेय साहित्यांची कमतरता भासू नये. उच्च शिक्षणासाठी अशा अडचणी येऊ नयेत म्हणून गेली अनेक वर्षे गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप मनसे माध्यमातून करण्यात येते. यावर्षीही मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर प्रभाग क्र. २५ ठाकुर्ली, चोळेगाव, खंबालपाडा, इंदिरा नगर तर्फे विभाग अध्यक्ष प्रदिप शरद चौधरी आणि महाराष्ट्र सैनिक शारदा प्रदिप चौधरी आयोजित केला होता.
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम ठाकुर्ली येथील नानासाहेब धर्माधिकारी सभागृह झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते. मोफत वह्या वाटप करतांना विद्यार्थ्यांचे गुणपत्रिका पाहून मोफत वह्या देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थांनी गर्दी केली होती. नवीन वह्या मिळणार म्हणून विद्यार्थी खुश होते. लहान शिशुवर्गातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले तर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले.