डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवलीतील क्षितिज मतिमंद मुलाच्या शाळेतील विद्यार्थीनी सेजल जेसवाल हीची स्पेशल ऑलिम्पिक फुटबॉल स्पर्धेत निवड झाली आहे. ७ तारखेला सकाळी १० वाजता सेजल दिल्लीला जाणार आहे.तिथून ती जर्मनी, बर्लीन येथे जाणार आहे. त्या निमित्त सोमवारी क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत तिच्या आई वडिलांच्या उपस्थित शुभेच्छा देण्यात आल्या.
डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी परिसरातील क्षितिज संचालित गतिमंद मुलांच्या शाळेत शिकणारी सेजल दिव्यात राहत असून तिचे वडील रिक्षाचालक आहेत.सोमवारी संस्थेच्या अध्यक्षा अनिता दळवी, माजी महापौर आरती मोकल, उपाध्यक्ष माधुरी , सचिव रंजनी कदम खजिनदार लक्ष्मी रंगनाथन, मुख्याध्यापिका सीता कृष्णमूर्ती , अनु गुरव यासह शाळेतील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.सेजलच्या फुटबॉल प्रशिक्षक सुनंदा मोहिले यांचेही उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. तिचे वडील सुरजचंद्र हे दिव्यात रिक्षा चालवतात.
शाळेच्या कार्यक्रमात उपस्थित असलेले सुरजचंद्र यांनी आपल्या मुलीचा सत्कार होताना पाहून त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.तर तिची आई पार्वती हीने मला सेजलसाठी मुलगी असल्याचा अभिमान असल्याचे सांगितले.सत्काराला उत्तर देताना सेजल म्हणाली, मला फुटबॉल खेळाची खूप आहे.मला आईवडील , शाळेचे शिक्षक यांनी खूप मदत केली.