डोंबिवलीत पश्चिमेला 'ह' प्रभाग क्षेत्र कार्यालयसमोर रस्त्याच्यामध्ये पडले झाड

 


     दुचाकीस्वार जखमी

डोंबिवली / शंकर जाधव :  डोंबिवली पश्चिमेला रेती बंदर रोडवरील 'ह'प्रभाग क्षेत्र कार्यालयासमोर रविवारी रात्री साड़े नऊ वाजण्याच्या सुमारास एक मोठे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली.हे झाड मुळापासून रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहनचालकांना वाहने चालविण्यास मुश्किल झाले होते. एका मोटारसायकलस्वाराला किरकोळ मार लागला असून त्याच्यावर जवळील दवाखान्यात उपचार  करण्यात आले.नागरिकांनी अग्निशामक दलाला या घटनेची माहिती दिली.



Post a Comment

Previous Post Next Post