नेहा उर्फ तितली स्टारप्लसवरील आपल्या आगामी मालिकेत फ्लोरिस्टची भूमिका साकारत आहे. तिला फुले खूप आवडतात आणि तिला फुलांचेही उत्तम ज्ञान आहे. तितली ही अहमदाबादची असून नुकतीच तिने मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध फुल बाजाराला भेट दिली आणि तिथल्या फूल विक्रेत्यांसोबत संवाद साधला.
*यावर नेहा सोलंकी उर्फ तितली म्हणाली,* "मला जेव्हा कळले की तितली या मालिकेत मी फ्लोरिस्टची भूमिका साकारणार आहे, तेव्हापासून मी त्याबद्दल खूप उत्सुक होते. मी नैनितालची असल्यामुळे माझे लहानपण नेहमीच विविध प्रकारच्या सुंदर सुंदर फुलांच्या सहवासात गेले आहे. मी शाळेच्या सुट्टीत अनेकदा फ्लॉवर व्हॅलीला भेट देत असे. फुलांसोबतचे माझे बाँडींग बघताना आता मला असे वाटते की मी याच भूमिकेसाठी बनले आहे. फुले ही एक सुंदर निर्मिती आहे आणि ते नेहमीच माझा मूड फ्रेश करतात. अलीकडेच मी मुंबईतील दादरच्या प्रसिद्ध फुलांच्या मार्केटमध्ये गेले होते. मी तिथल्या फुलविक्रेत्यांशी संवाद साधला. त्यांची देहबोली आणि ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत समजून घेतली, जेणेकरून मी फ्लोरिस्ट म्हणून माझी भूमिका अधिक सफाईदारपणे करू शकेन. तिथल्या एका बाईने मला फुलांचे ब्रेसलेट भेट दिले, जे माझ्याकडे अजूनही आहे. त्या फुलवाल्या बाईचे हावभाव खूप गोड होते. एकूणच तिथल्या फुल विक्रेत्यांशी संवाद साधणे हा एक छान अनुभव होता. ते अतिशय विनम्र होते, बाजारात गर्दी असतानाही ते हसतमुख आपले व्यवहार करत होते. या भूमिकेसाठी फुलबाजारात जाणे खूप उपयुक्त ठरले. तितली या माझ्या पात्रासाठी मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या."
तितली ही मालिका सोमवार ते रविवार स्टारप्लसवर ६ जूनपासून रात्री ११ वाजता प्रसारित होणार आहे. तितलीची निर्मिती स्टोरी स्क्वेअर प्रॉडक्शनने केली आहे.