जेनेरिक औषधासाठी सरकारने ग्रामीण भागातही जनजागृती करावी

 

   गुलाब गुप्ता यांचे मत 

 डोंबिवली / शंकर जाधव : डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथे स्वस्त औषधी विक्री केंद्र डोंबिवली जेनेरिक मेडिसीन दुकांचे केबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी जेनेरिक औषधाबाबत माहिती देताना गुलाब गुप्ता यांनी ही औषधे गरीब रुग्णांसाठी गरजेची असतात, कारण या औषधांची किमंत फार कमी असते. जेनेरिक औषधांची संपूर्ण माहिती जेनेरिक औषधे ही अशी असतात ज्यांचे स्वतःचे ब्रँड नाव नसते आणि बाजारात फक्त त्यांच्या जेनेरिक नावाने ओळखले जातात. जेनेरिक औषधे सर्वाना माहित होण्यासाठी सरकारने ग्रामीण भागातही जनजागृती करणे आवश्यक आहे असे मत गुलाब गुप्ता यांनी व्यक्त केले.

जेनेरिक औषधे (प्रजातीय औषधे) म्हणजे अशी औषधे ज्यातील औषधाचे प्रमाण, त्याची गुणवत्ता,वहनाचा मार्ग, त्याचा उपयोग आणि त्याची कामगिरी ब्रॅंडेड औषधासारखीच असते पण त्याला कोणतेही ब्रॅंड नाव नसते. त्याचा रंग, आकार आणि पॅकिंग वेगळे असते. ही औषधे त्या त्या देशातील सरकारी नियमांप्रमाणेच तयार केलेली असतात.

 जरी काही औषधांची ब्रँड नावे असली तरी ती खूप स्वस्त आहेत आणि जेनेरिक औषधांच्या श्रेणीत येतात. जेनेरिक औषधांबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक गैरसमज आहेत. जेनेरिक औषधांच्या कमी किमतीमुळे त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे आणि तज्ञांचे मत आहे की जेनेरिक औषधांबद्दल लोकांचे गैरसमज दूर करण्याची गरज आहे.कारण ते स्वस्त आणि प्रभावी दोन्ही आहे.

   या जेनेरिक औषधाच्या दुकानाला माजी नगरसेवक महेश पाटील, माजी नगरसेविका सायली  विचारे,गोरखनाथ महाले, सुरेखा पांडे, दमयंती भानुशाली, मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत, विजय टाटीया यांसह अनेक मान्यवरांनी भेट दिली.



Post a Comment

Previous Post Next Post