दिव्यात महिला डॉक्टरची छेडछाड

 


पोलीसांनी आरोपीला पाठीशी घातले

दिवा / आरती मुळीक परब: दिव्यात बेडेकर नगर येथील भागात एका महिला डॉक्टरने मे महिन्यात स्वतःचे क्लिनिक टाकून प्रॅक्टीस सुरु केली होती. त्यानंतर तेथील रहाणाऱ्या टपोरी पोरांकडून त्या डॉक्टरची रात्रीच्या वेळी छेडछाड सुरु झाली आहे. त्यांनी रितसर पोलीसांत तक्रार देऊन ही पोलीस कोणतीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु आहेत.

बेडेकर नगर येथे बेडेकर इंग्लिश स्कूल शेजारी अस्था क्लिनिकच्या डॉ. स्वप्नाली जगताप हीने मे महिन्यात स्वताःचे क्लिनिक आणि त्याच्या शेजारीच भावाचे मेडिकलचे दुकान सुरू केले. पण त्या दिवसापासून त्यांना तेथील टपोरी मुलांनी त्रास द्यायला सुरुवात केली. त्यांच्या क्लिनिकचे विजेचे मीटर तोडलेक्लिनिक आणि मेडिकल मध्ये छोटे छोटे दगड मारणेतेथे घाण टाकणेबाहेर दारात लावलेले दिवे चोरणेक्लिनिकच्या दारातच दुचाकी गाडी लावणे असे प्रकार व्हायला लागले. या सर्व प्रकाराला कंटाळून त्या डॉक्टरने सीसीटीव्ही क्लिनिकच्या आणि मेडिकलच्या बाहेर लावला. त्यानंतर त्यांचा त्रास कमी न होता अजूनच वाढला आहे.

त्या डॉक्टरकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे देखील त्या टपोरी मुलांकडून फोडून टाकण्यात आल्याचे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले. एका महिला डॉक्टरला अशा पध्दतीने त्रास दिला जात असताना यानिमित्ताने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वैद्यकीय सेवा देणाऱ्या महिला डॉक्टरला अशी वागणूक दिली जात असल्याने स्थानिक जनतेतून संताप व्यक्त होत आहे.

हा प्रकार गंभीर आहे. माझी पोलिसांना हात जोडून विनंती आहे त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन महिला डॉक्टरला त्रास देणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी.

सतीश केळशिकर, ठाणे उपाध्यक्ष, भाजप

 

मला जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. क्लिनिकच्या बाहेर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडण्यात आले. या टपोरी मुलांकडून सीसीटीव्ही काढ नाहीतर आम्ही तोडून टाकू अशी दवाखान्यात येऊन धमकी दिली गेली. त्यांची नावे पोलिसांना दिली आहेत. त्यांनी तक्रार घेताना त्या दोन मुलांमधील एकाचे नाव ही चुकीचे टाकले आहे. पोलिस त्यांना पाठीशी घालत आहेत. त्या टपोरी मुलांनी आमच्या वर पोलीस कारवाई करणार नाही. तुला जे करायचे ते तू कर असे सांगितले. पोलीसांनी चांगली कारवाई करावी ही माझी विनंती आहे.

डॉ. स्वप्नाली जगताप, अस्था क्लिनिक

 त्या टपोरी मुलांना बोलवून चांगली समज देण्यात आली आहे. त्या डॉक्टरांची रितसर तक्रार नोदवूनही घेतली आहे. त्यांना अजून मुलांनी त्रास दिल्यास तक्रार करावी.

पोलीस निरिक्षक शहाजी शेळके, पोलीस चौकी, दिवा

Post a Comment

Previous Post Next Post