दावडीत प्रत्यक्षात घेतला भात शेतीचा अनुभव
डोंबिवली ( शंकर जाधव ) : भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकरी दिवसरात्र मेहनत करून देशाला अन्न धान्य पुरवितात. कोणत्या राज्यात कोणते अन्न पिकवली जातात याचा उल्लेख पुस्तकातून विद्यार्थ्यांना शिकवले जाते, मात्र शेतकरी शेती कसा करतो हे प्रत्यक्षात अनुभवल्या शिवाय कळणारे नसते. याच उद्देशाने डोंबिवलीतील टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुलमधील विद्यार्थ्यांनी दावडी येथे दावडी येथे शेतामध्ये भात लागवड कशी करतात? हे दाखवण्यात आले. गुडघाभर चिखलात उतरून सर्व विद्यार्थ्यांनी भाताची रोपे कशी काढतात? त्या रोपांची मुळे कशी धुवतात व परत त्याची लागवड कशी करतात? याचा प्रत्यक्ष अनुभव शेतातल्या चिखलामध्ये जाऊन विद्यार्थ्यांनी घेतला.टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ संचालित लोकमान्य गुरुकुलमध्ये क्षेत्रभेटीतून भातशेतीचा अनुभव आला.
विद्यार्थ्यांना दावडी येथे शेतामध्ये भात लागवड कशी करतात हे दाखवण्यात आले.भाताचे पीक कोणत्या ऋतूत काढतात ?त्यासाठी कोणती जमीन आवश्यक आहे? पोषक वातावरण काय आहे? या सगळ्याची माहिती सुलोचना गोरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. शेतकरी कष्ट करून शेती करतो .त्यामुळे आपण आपल्या ताटातलं अन्न वाया जाऊ देऊ नये किंवा टाकू नये याचेही महत्त्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना यावेळी सांगण्यात आले.
भातशेतीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे चिखलात माखण्याचा आनंद लुटला. बाजूलाच असलेल्या छोट्या पाण्याच्या डबक्यात भिजण्याचाही आनंद लुटला.
यावेळी मंगेश गायकर, सुलोचना गोरे-चौधरी, सारिका लोखंडे, लोकमान्य गुरुकुलाचे लिपिक श्रीकांत श्रीखंडे, उपक्रम प्रमुख व्यंकटेश प्रभुदेसाई, मुख्याध्यापिका अर्चना पावडे हे शिक्षक उपस्थित होते.अशा पद्धतीने ही क्षेत्रभेट आयोजित करण्यात आल्याचे मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी सांगितले.