डोंबिवली ( शंकर जाधव ) : कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने डोंबिवली वाहतूक उपविभाग आणि रोटरी क्लब मीटडाऊन, सेफ्टी वेल्फेअर असोसिएशन, अनेक शाळा,आरएसपी शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सकाळी आठ वाजता रॅली काढण्यात आली होती.
विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत विविध पोस्टर्स, बॅनर्स व्दारे जनागृती केली. रॅलीत १२ शाळा, २०५ विद्यार्थी, ४० शिक्षक सहभागी झाले होते. कॅप्टन विनयकुमार सच्चान स्मारक, घारडा सर्कल डोंबिवली पूर्व या ठिकाणी शहिदांना आदरांजली अर्पण करून रॅलीची सांगता झाली.
Tags
महाराष्ट्र