डोंबिवली ( शंकर जाधव ) : अमेरिकेच्या कोलोरॅडो स्प्रिंग्ज येथे पार पडलेल्या जागतिक जम्परोप चॅम्पियनशिप (दोरी उडी) २०२३मध्ये भारताच्या संघाने उत्तम कामगिरी केली.विशेष म्हणजे भारताच्या विजेता टीममध्ये बहुतेक खेळाडू महाराष्ट्रातील असून सहा डोंबिवलीकर खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. हे सर्व खेळाडू १२ ते १६ या वयोगटातले आहेत. या स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी एकूण ९ गोल्ड, ३ सिल्व्हर आणि ७ ब्रॉंझ पदक जिंकले. जम्परोपसारख्या खेळात सातासमुद्रापार जाऊन देशाची मान उंचावणाऱ्या या सर्व खेळाडूंचे जितकं कौतुक होत आहे. या स्पर्धेतील कोच अमन वर्मा आणि तन्मय कर्णिक यांचाही या मुलांच्या विजयात मोलाचा वाटा आहे.
विजयी खेळाडू
१) नमन गंगवाल, २ गोल्ड, सिल्व्हर (नाशिक)
२) नियती छोरिया, २ गोल्ड, सिल्व्हर (नाशिक)
३) ईशान पुथरन, २ गोल्ड, २ ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली)
४) भूमिका नेमाडे, २ गोल्ड, ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली)
५) राजुल लुंकड, गोल्ड (नाशिक)
६) मानस मुंगी, सिल्व्हर, ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली)
७) अंकिता महाजन, ब्रॉंझ (सिस्टर निवेदिता हायस्कुल,डोंबिवली)
८) तन्वी नेमाडे, ब्रॉंझ (रॉयल इंटरनॅशनल सीबीएससी स्कुल,डोंबिवली)
९) योगिता सामंत, ब्रॉंझ (चंद्रकांत पाटकर विद्यालय,डोंबिवली)