बातें कुछ अनकही सी' मध्ये सायली साळुंखे दिसणार

 स्टार प्लसवर सर्वात मोठा म्युझिकल फिक्शन शो 

स्टार प्लस नेहमीच आपल्या असामान्य आणि नाविन्यपूर्ण कथानकांसाठी ओळखले जाते आणि आता आपली आगामी मालिका 'बातें कुछ अनकही सी' सोबत स्टार प्लस आपली सर्वात मोठी म्युझिकल फिक्शन मालिका आणण्यासाठी सज्ज झाले आहे. या मालिकेद्वारे, स्टारप्लस तिशी चाळिशीतील दोन व्यक्तींची स्वप्ने आणि त्यांचा एकमेकांसोबत जोडलेला प्रवास यांची कथा चित्रित करणार आहे.

मराठमोळी अभिनेत्री सायली साळुंखे आणि मोहित मलिक अभिनीत, ही एक संगीतमय, काल्पनिक प्रेमकथा आहे जी वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील दोन मध्यमवयीन व्यक्तींभोवती फिरते, जेव्हा ते एकमेकांसमोर येतात तेव्हा त्यांच्या भिन्न जगाविषयीची मते एकमेकांना भिडतात आणि संगीत त्यांच्या प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

'बातें कुछ अनकही सी' चे निर्माते राजन शाही यांची ही आणखी एक प्रगल्भ कथा असून ही एका अनोख्या आवाजाच्या मुलीची कहाणी आहे. अनेक अडथळे पार करत ती संगीत क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करते. राजन शाही यांनी स्टार प्लस सोबत अनेक अप्रतिम मालिकांची निर्मिती केली आहे ज्या मध्ये अनुपमा, बिदाई, ये रिश्ते हैं प्यार के, तेरे मेरे शहर, मन की आवाज, प्रतिज्ञा, ये रिश्ता क्या कहलाता है अशा अनेक लोकप्रिय नावांचा समावेश आहे. बातें कुछ अनकही सी सोबत राजन शाही पुन्हा एकदा आणखी एक नवीन रेकॉर्ड तयार करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

स्टार प्लस, जो नेहमीच प्रेक्षकांना दर्जेदार आणि विचारप्रवण कथानक देण्यासाठी ओळखले जाते, आणि या मालिकेद्वारे पुन्हा एकदा समाजात एक नवीन विषय घेऊन येत आहे. उशीरा होणाऱ्या लग्नाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांना आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याच्या दृष्टीकोनासाठी देखील मदत करेल. ही मालिका मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आकर्षित करेल.

राजन शाही निर्मित 'बातें कुछ अनकही सी' ही मालिका लवकरच स्टार प्लसवर प्रसारित होणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post