दिवा / आरती परब : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कार्यसम्राट खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून, तसेच माजी उपमहापौर रमाकांत मढवी आणि सर्व नगरसेवक, पदाधिकारी यांच्या प्रयत्नांमुळे श्रीमती यशोदा बाळाराम पाटील नगर, साबे येथील बाळाराम अपार्टमेंट ते किआरा हायट्स या दरम्यान २५० मीटर लांबीच्या अंतर्गत रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण सुरू करण्यात आले आहे.
या कामाची प्रत्यक्ष पाहणी निलेश पाटील यांनी केली. नागरिकांच्या दीर्घकाळाच्या मागणीची पूर्तता होत असल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. याआधी या रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना, लहान मुलांना, महिलांना व वृद्धांना चालणेही कठीण झाले होते.
आता तातडीने सुरू झालेल्या काँक्रीटीकरणामुळे वाहतूक सुलभ होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हे काम परिसरातील रहिवाशांसाठी जीवनमान सुधारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल.