​आंदोलक महिलांच्या मदतीसाठी दिवा मनसेची पोलीस ठाण्यात धाव

 ​

दिवा :  आज सकाळी दिवा रेल्वे स्थानकात झालेल्या महिलांच्या उद्रेकानंतर रेल्वे पोलिसांकडून या महिलांवर कारवाई करून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर मनसेचे दिवा शहर अध्यक्ष तुषार भास्कर पाटील यांनी सहकाऱ्यांसोबत आर. पी. एफ. पोलीस अधिकारी तिवारींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. माहिलांचा झालेला उद्रेक का पूर्वनियोजित नसून, त्यावेळी झालेली एक नैसर्गिक प्रतिक्रिया होती, असे त्यांनी तिवारींच्या निदर्शनास आणून दिले. दिव्यातील रेल्वे प्रवाशांना या असंख्य अडचणींचा रोजच सामना करावा लागतो, विशेषतः महिलांना त्याचा जास्त त्रास होतो.

मुंबईला जाणाऱ्या फलाटांची दिशा बद्दलल्यापासून तर दिवेकारांना लोकल मध्ये चढायलाच मिळत नाही, डोंबिवली वरून येणारे प्रवासी ज्यांना ठाण्याला उतरायचे असते ते दिव्यातील प्रवाशांना चढुच देत नाही हा मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला. या महिलांची दुपारी जामिनावर सुटका करण्यात आली. यावेळी याठिकाणी दिवा गावचे पोलीस पाटील प्रशांत पाटील, दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत, प्रशांत गावडे हे देखील यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post