दुध व्यवसायिकला अटक
डोंबिवली ( शंकर जाधव ) : आर्थिक परिस्थिती नसल्याने दूध टाकण्यासाठी दुचाकीची चोरी करणाऱ्या दूध व्यवसायिकाला डोंबिवली रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकून अटक केली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश म्हाडसे असे अटक केलेल्या दूध व्यवसायिकाचे नाव आहे. गणेशाला दूध टाकण्यासाठी दुचाकीची गरज होती. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने त्याला दुचाकी विकत घेता येत नव्हती. गणेशने यावर दुचाकी चोरी करण्यासाठी निर्णय घेऊन डोंबिवलीत चोरीची योजना आखली.गणेशने डोंबिवली पूर्वेकडील सारस्वत कॉलनी परिसरातून दुचाकी चोरली. डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.या प्रकरणी पोलीसांनी सारस्वत कॉलनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून डोंबिवली रामनगर पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या गणेशला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील चोरी केलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली.
दूध व्यवसायिक गणेश म्हाडसे हा मुरबाड खापरी गावात राहतो. ग्राहकापर्यंत दूध पोहचवण्यासाठी त्याला दुचाकीची गरज होती मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने ते शक्य नव्हते. व्यवसाय करायचा पण पैसे नाहीत यात चिंतेत असलेल्या गणेशने दुचाकी चोरी करण्याचे ठरविले. त्याने दुचाकी चोरी करण्यासाठी डोंबिवली शहरात जाण्याचा निर्णय घेतला. त्याने डोंबिलीत दुचाकी चोरी करून मुरबाडला गेला.