डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीकरांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचे कौतुक करत शहरात जोरदार बॅनरबाजी केले आहे. 'हनुमान चालीसा लोकसभेत घुमली, शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली' असे बॅनरवर लिहून दमदार खासदार, हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार या शब्दांत श्रीकांत शिंदे यांचे कौतुक करणाऱ्या बॅनर शिवसेना शिंदे गटांकडून डोंबिवलीत लावण्यात आले आहे.
संसदेतील अविश्वास प्रस्तावावर बोलताना शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टिका केली. शिंदे यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित करताच विरोधकांनी प्रश्न विचारले की तुम्हाला हनुमान चालीसा येते का ? त्यानंतर विरोधकांना उत्तर देत खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालीसाचे पठण केले होते.
Tags
महाराष्ट्र