डोंबिवली नाभिक समाजाचे निवेदन
डोंबिवली ( शंकर जाधव ) : कोकणातील चिपळूण तालुक्यातील नाभिक समाजातील निलिमा सुधाकर चव्हाण हिच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ नाभिक समाजाने कल्याण तहसीलदार जयराज देशमुख तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले. खुन्यांना तात्काळ पकडुन कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नाभिक समाजाने निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी डोंबिवली नाभिक समाज संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब राऊत सचिव मंगेश पोफळे खजिनदार बाळा पवार उपाध्यक्ष रमेश वखरे सहखजिनदार तुषार शिंदे,क्राईम बॉर्डर चे संपादक राजेंद्र वखरे, विश्वस्त संतोष शर्मा, क्रिष्णा कारुडकर, शिवाजी वैद्य,दशरथ चिते,सोमनाथ वरपे,आसाराम आतकारे, महेश काशीद उपस्थित होते.
Tags
महाराष्ट्र