पर्यावरण , निसर्ग, देशप्रेम, पशू पक्षी वारली पेंटिंग
डोंबिवली ( शंकर जाधव ) : श्रीमती के सी गांधी शाळेचे कलाशिक्षक अमोल पाटील यांनी रघुकुल शैक्षणिक ट्रस्ट डोंबिवली द्वारे या उपक्रमातडोंबिवलीतील विविध शाळांमधून १३९ विद्यार्थी जुन्या छत्र्या रंगविल्या.
मुलांनी जुनी छत्री आणावी व सुंदर रंगांनी रंगून न्यावी असा हा उपक्रम होता यासाठी सर्व रंगसाहित्य संस्थेद्वारे देण्यात आले होते. यासाठी साधारण १३ लिटर रंग लागले. संस्थेचे अध्यक्ष चित्तरंजन पाटकर, मेघना प्रभू आदी मान्यवर उपस्थित होते. उपक्रमाच्या सुरवातीस चित्रकला शिक्षक अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्री रंगविण्याबाबत विविध सोप्या पद्धती , कसब ,कौशल्य, याबाबत रंगकाम कशाप्रकारे करावे असे मार्गदर्शन व मुलांना छत्री रंगविण्यासाठी उत्साहित केले.
मुलांकडून पर्यावरण , निसर्ग, देशप्रेम, पशू पक्षी वारली पेंटिंग अशा विविध विषयावर सुदंर छत्र्या रंगवून घेतल्या. पाच तास बसून मुले छत्री रंगविण्यात तल्लीन झाली होते. मुलांनी विविध आकर्षक रंगसंगतीत सुदंर छत्र्या रंगून कलागुणांचे सादरीकरण केले. यात प्रामुख्याने मुलांनी लाल पिवळा व निळा हिरवा या रंगांचा उपयोग केला. छत्री रंगविण्याचा मनसोक्त आनंद लुटला. या उपक्रमासाठी के बी वीरा शाळेचे कलाशिक्षक शेखर पाटील , व आरटीपी शाळेचे नारायण महाजन यांनी चित्र रेखाटन कसे करावे छत्री अधिक आकर्षक कशाप्रकारे करता येईल तसेच विविध रंगछटा करून मुलांना सहकार्य केले, दिगंबर जोगमर्गे , दिपाली शिनकर, आशुदेवी खंडेलवाल, नरेंद्र राणे या शिक्षकांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.