मुंबई: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौर्यावर येणार आहेत. दरवर्षी प्रमाणे ते मुंबईत येऊन लालबागच्या राजाचे यंदाही दर्शन घेणार असल्याची माहिती आहे. सहकुटुंब मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचे दर्शन घेणार आहे. त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील १६ आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईसह दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबईच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी देखील अमित शहा हे राजाच्या चरणी नतमस्तक झाले होते. दुपारी तीन वाजून ३० मिनिटांनी लालबागमध्ये उपस्थित असणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या राजाच्या दरबारात २५ मिनटे असणार आहेत. त्यासाठी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा आणि मुंबई पोलीस विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवणार आहेत.
अमित शहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानच्या बाप्पाचे दर्शन घेतील. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या घरातील गणपतीचे देखील अमित शहा दर्शन घेणार आहेत. दरम्यान मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमधील सर कावजी जहांगीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानाला गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सात वाजता ते पुन्हा दिल्लीला रवाना होतील.
.jpeg)