Ganpati viserjan : कल्याण - डोंबिवलीत एकूण दीड दिवसाचे १५,६५५ श्री गणेश मूर्तीचे विसर्जन

कल्याण: कल्याण - डोंबिवलीतील श्री गणेशाचे विसर्जन शांततामय वातावरणात पार पडले. महापालिका क्षेत्रात बुधवारी उशीरापर्यंत दीड दिवसाचे एकूण १५,६५५ श्री गणेश मूर्तीचे विसर्जन विविध विसर्जन स्थळांवर करण्यात आले.

यामध्ये सर्व प्रभागात मिळून ३,७१२ शाडूच्या ११,९४३ पिओपीच्या श्रीगणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेकडून प्रदुषणमुक्त गणेशोत्सवाची संकल्पना राबविली जात आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

यवर्षीच्या दीड दिवसाच्या श्री गणेशाच्या विसर्जनावेळी सुमारे ३२% पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीचे विसर्जन झाल्याचे पाहावयास मिळाले. संकलित केलेले हे निर्माल्य कल्याण येथील ऊंबर्डे मधील बायोगॅस प्रकल्पात नेवून त्यापासून खत निर्मिती करण्यात येणार आहे. निर्माल्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट आता लावली जात असल्याने नदी, खाडीमध्ये हे निर्माल्य जावून सदर जलस्त्रोत प्रदूषत होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. 



 

Post a Comment

Previous Post Next Post